पावसाळा उजाड रानाची जाई अवकळा... गाव जागवाया सारा शीळ घालीते कोकीळा.. मोर नाचतो रानात पायी घालुन ग वाळा.. धारा अमृताच्या ...सारा फुलवीती मळा..! असा येई पावसाळा घेऊनिया मेघ दळा.. चार मास येतो परीआला पावसाळा- सखे आला पावसाळा.. सरीवर-सरी जणु मोतीयांच्या माळा.. झेलूनीया आग तिनं सोशिल्या गं कळा... काळ्या भरल्या ढगांचा धरा पहाते सोहळा...! दान घाली खळखळा.. त्याला पूजीन-पूजीन सखे पाहीन ह्या डोळा... आला पावसाळा सखे आला पावसाळा..! ब्रम्हा पुजारी ११ जुन २०१९
|

No comments:
Post a Comment