कुंजरगड-आजोबा-कात्राबाई
या वेळी प्रसाद ने अगदी भन्नाट प्लॅन आखला . कुंजरगड-आजोबा-कात्राबाई च्या छत्रछायेमध्ये पायपीट करायचे ठरले आणी बघता बघता २२-२३ जणांचा जथ्था तयार झाला. आकाराने मोठा असलेल्या ह्या नगर जिल्ह्याने किती गडकोट आणि घाटवाटा व्यापल्या आहेत हे कदाचित् स्वतः ला खास "नगरी " म्हणवून घेणाऱ्या अव्वल लोकांना ही सहजासहजी कळेल असे वाटत नाही !!! असो .नेहमी प्रमाणे नेतृत्व प्रसाद ने स्विकारले असल्यामुळे ह्या वेळी देखील इतर गोष्टींची दगदग झाली नाही ,आमची गाडी भल्या पहाटे अंदाजे ३.३० -३.४५ ला विहीर गावी पोहोचली . बाजूने वेढलेल्या उंचच उंच पर्वत रांगा आणी समोर " आ " वासून उभा ठाकलेला कुंजरगड लख्ख चंद्र प्रकाशात आम्हाला खुणावत होता. सुदैवाने थंडी देखील गुलाबीच होती आणी त्या मध्ये थोडीशी झोप घेण्याची छान अशी संधी आम्हाला मिळाली . पहाटे अंदाजे ६ वाजता योगीता आणी इतर धडपड्या लोकांनी कधी उठुन आमच्या साठी पोहे बनविले हे देखील कळाले नाही . सकाळचे सोपस्कार उरकून चहा पोह्यावर ताव मारुन आणी वाटाड्या ला सोबत घेउन आम्ही अंदाजे ७ वाजता गडाच्या दिशेने निघालो. सुरवातीला १५-२०

