उद्वेग आणि आवेष सारा
दावीते संवेदना
कर्तव्य कर्माची प्रचीती
घडविते संवेदना
प्रेम सा-या जगतातले
स्विकारते संवेदना
द्वेष सा-या दुनीयेतला
धीःकारते संवेदना
कल्लोळ सा-या वेदनांचा
पळवीते संवेदना
बंध आणि भाव सारा
मिळवीते संवेदना
राघवाची पायरी
कवटाळीते संवेदना
माधवाची बासरी
छेडीते संवेदना
हर्ष आणि क्लेश सारे
जाणीते संवेदना
तुमच्या मध्ये माझ्या मध्ये
विसावीते संवेदना
ब्रम्हा पुजारी
१२.०५.२०१७
No comments:
Post a Comment